Maharashtra Assembly Election 2024 | शरद पवारांचा आणखी एक डाव भाजपवर भारी; नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; बडा नेता तुतारी फुंकण्याच्या तयारीत

नाशिक : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar NCP) इन्कमिंग वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान नाशिकमध्ये भाजपला (BJP) आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे निकटवर्तीय असणारे गणेश गीते (Ganesh Gite) यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो.

नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते हाती तुतारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिते आज मुंबईत शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला जाणार आहे.

गणेश गिते यांना विधानसभा लढवायची आहे. पण महायुतीमध्ये (Mahayuti) नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे सध्याचे विद्यमान आमदार राहुल ढिकले आहेत. त्यांचे तिकीट जवळपास निश्चित मानले जातेय. त्यामुळे नाशिक पूर्वमधून लढण्यास इच्छूक असणारे गणेश गिते हाती तुतारी घेण्याच्या तयारीत आहेत. भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.