Global Education Fair 2024 | ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’ ला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

हजारो विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळाल्या परदेशी शिक्षणाच्या अनेक संधी
पुणे : Global Education Fair 2024 | परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ”स्टडी स्मार्ट’च्या वतीने ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’चे पुण्यातील बोट क्लब येथे आज 18 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले. यामध्ये यूके, यूएसए, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबई येथील जवळपास 50 हून अधिक सर्वोत्तम विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करता आल्याने विद्यार्थ्यांनी येथे मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी नि:शुल्क मार्गदर्शन मिळाले. ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’मध्ये एकाच छताखाली अनेक परदेशातील शिक्षणाच्या अनेक संधी व पर्याय उपलब्ध झाल्या.
यावेळी इंद्र छाजेड (अध्यक्ष जितो पुणे चॅप्टर), चेतन भंडारी (उपाध्यक्ष जितो पुणे चॅप्टर), दिनेश ओसवाल ( मुख्य सचिव, जितो, पुणे चॅप्टर), गौरव भाटिया, विशाल जैन ( जितो, एज्युकेशन सहाय्यक कार्यक्रम) आदी मान्यवर उपस्थित होते.
अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र कोठे योग्य संधी उपलब्ध आहेत? शैक्षणिक कर्ज कसे मिळू शकते? परदेशी जाण्यासाठी कोणत्या स्कॉलरशिप असतात? हे सगळे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’ भरवण्यात आले. या फेअर मध्ये परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे समाधान झाले; तसेच परदेशात विविध क्षेत्रातील शिक्षणाच्या संधींबद्दल माहिती मिळाली. फेअरचे हे 15 वे वर्ष असल्याची महिती स्टडी स्मार्ट चे संचालक चेतन जैन यांनी दिली.