Ajit Pawar Vs Sharad Pawar | दोन बडे नेते तुतारी फुंकणार, राजकीय हालचालींना वेग; अदिती तटकरेंची कोंडी करण्यासाठी शरद पवारांचा डाव

मुंबई : Ajit Pawar Vs Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर शरद पवार राजकीय डाव टाकताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांचे निष्ठावंत सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना शरद पवार गटाकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सतीश चव्हाण हे गंगापूर विधानसभेसाठी (Gangapur Assembly) इच्छूक आहेत. त्यामुळे सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे. ते लवकरच तुतारी हाती घेऊन शरद पवार गटात प्रवेश करु शकतात.
तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजकीय आव्हान निर्माण केले जाणार आहे. ज्ञानदेव पवार (Dnyandev Pawar) हे आज मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्ञानदेव पवार हे माणगावचे माजी नगराध्यक्ष आहेत. ते सध्या शिंदे गटात आहेत. त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने रायगडमध्ये (Raigad Assembly) अदिती तटकरे यांच्या विरोधातील मविआची (Mahavikas Aghadi) ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
अदिती तटकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून (shrivardhan Assembly Constituency) ज्ञानदेव पवार निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे म्हटले जातेय. त्यामुळे ओबीसी समाजाचा नवा चेहरा ज्ञानदेव पवार यांच्याकडे बघितले जाते. या मतदार संघात ६० टक्के ओबीसी समाज असल्याने त्याचा फायदा होऊ शकतो.
श्रीवर्धन मतदार संघात ओबीसी समाजाला अद्याप नेतृत्व न मिळाल्याने पवार यांची ताकद मजबूत करण्यासाठी ओबीसी समाजाने देखील त्यांना पाठबळ देण्याचे ठरवले आहे. दरम्यान आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ज्ञानदेव पवार यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.