Sameer Wankhede | आयआरएस अधिकारी समीर वानखेडे महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढणार?, शिवसेना शिंदे गटाकडून हालचाली सुरु

मुंबई : Sameer Wankhede | राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. निवडणुकीची घोषणा होताच उमेदवारांची जुळवाजुळव सुरु आहे.
मुंबईतील धारावी हा राखीव मतदारसंघ आहे (Dharavi Assembly Constituency). या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विजय मिळवला होता. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेत त्या खासदार झाल्या. आता त्यांच्या जागी काँग्रेसकडून ज्योती गायकवाड (Jyoti Gaikwad) उतरणार असल्याची माहिती आहे.
महायुतीच्या जागावाटपात धारावीचा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला (Shivsena Shinde Group) मिळाला आहे. त्यानुसार आता शिंदे गटाकडून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याबाबत शिवसेना शिंदे गटाकडून हालचाली सुरु आहेत.