Pune Crime Branch News | चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणार्या नराधमास दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने केले जेरबंद

पुणे : Pune Crime Branch News | चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार (Sexual Assault) करुन पळून गेलेल्या नराधमाला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. विजय स्वामी बामू (वय ४०, रा. ताराबाग सोसायटीजवळ, शक्तीनगर, घोरपडी) असे या नराधमाचे नाव आहे. (Arrest In POCSO Act)
या गुन्ह्यातील पिडिताची आई विजय बामू याला भाऊ मानत होती. त्याने भावा बहिणीच्या नात्याला काळिमा फासत चार वर्षाच्या भाचीला तो घरातून घेऊन गेला तिच्यावर अत्याचार केला. आई घरी आल्यावर मुलीने पोट दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर विजूमामा याने काय केले हे यामुलीने आईला सांगितले. ते जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता तो पळून गेला होता.
गुन्हा दाखल झाल्यावर विजय बामू याचा सर्व जण शोध घेत होते. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बेरड व पोलीस अंमलदार विक्रांत सासवडकर यांना विजय बामू हा मुंढवा रेल्वे पुलाखाली येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. विजय बामू आल्यावर त्याला ताब्यात घेतले. ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करुन पुढील कार्यवाही करीता मुंढवा पोलिसांच्या (Mundhwa Police) ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलीस निरीक्षक छबु बेरड, पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, सुनिल महाडिक, विनायक रामाणे, विक्रांत सासवडकर, गणेश गोसावी, संदीप येळे यांनी केली आहे.