Nanded Lok Sabha Bypoll Election | नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरला; काँग्रेसपुढे गड राखण्याचे आव्हान तर अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागणार

मुंबई : Nanded Lok Sabha Bypoll Election | दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील नांदेड व केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ तसेच राज्यातील विधानसभा विधानसभेच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यानंतर राहुल गांधींनी वायनाडमधून राजीनामा दिला होता आणि रायबरेलीचे खासदार म्हणून शपथ घेतली होती. यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार आहेत.
महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण खासदार होते. त्यांचे निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार ठरला आहे. या मतदारसंघातून वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण (Ravindra Vasant Chavan) यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.