Maval Assembly Constituency | मावळ विधानसभेत सुनील शेळके यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी

Sunil-Shelke-Bapu-Bhegade (1)

मावळ : Maval Assembly Constituency | राज्यात विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकलं गेलं आहे. लवकरच सगळ्या पक्षांकडून जागावाटप ठरून उमेदवारांची नावं घोषित केली जाणार असतानाच आता पक्षांतर्गत धुसफूस समोर यायला लागल्या आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ajit Pawar NCP) वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान अजित पवारांचे अनेक शिलेदार त्यांची साथ सोडून जात आहेत. अशातच आता मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना पक्षातीलच पदाधिकारी विरोध करताना दिसत आहेत.

त्यामुळे मावळ मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत फुट पडण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले बापू भेगडे (Bapu Bhegade) यांनी महामंडळ नाकारले असून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. त्यामुळे मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या उमेदवारीला आता अजित पवार यांच्या गटातूनच विरोध होताना दिसत आहे.