Laxman Dhoble Meets Supriya Sule | लक्ष्मण ढोबळे घरवापसी करणार? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

मुंबई : Laxman Dhoble Meets Supriya Sule | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज मुंबईत सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. नुकतीच ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भाजपचा (BJP) राजीनामा देण्याची मागणी केली होती.

भाजपमध्ये मागील दहा वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (Sharad Pawar NCP) प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून लक्ष्मण ढोबळे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून (Mohol Assembly Constituency) तुतारी (Tutari) चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत.