Keshav Nagar Pune Crime News | तरुणीचा आईसमोर नातेवाईकाने केला विनयभंग; केशवनगरमधील घटना

पुणे : Keshav Nagar Pune Crime News | तरुणी आई व बहिणीसमवेत बसली असताना तेथे येऊन एका नातेवाईकाने तिच्याशी अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केला. त्याला तिने विरोध केल्यावर आता सोडले पुढच्या वेळी रेपच करेन, अशी धमकी दिली.
विकी विद्याधन नायर (वय ३५, रा. केशवनगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिसांकडे (Mundhwa Police) फिर्याद दिली आहे. ही घटना फिर्यादीच्या घराबाहेर रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, तिची आई व बहिण हे बसले होते. त्यावेळी विकी तेथे आला. फिर्यादीबरोबर अश्लिल चाळे करु लागला. तिच्या अंगाशी झटू लागला. तेव्हा तिने विकीला प्रतिकार केला. त्यावर तो आता तुला सोडले, परत सापडली तर तुझ्यावर रेप करीन अशी धमकी देऊन विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक लिंगे तपास करीत आहेत.