Bibvewadi Pune Crime News | मंगळसुत्र चोरताना चोरट्याने महिलेचा केला विनयभंग ! तब्बल १९ गुन्हे असलेल्या गुंडाला अटक

पुणे : Bibvewadi Pune Crime News | घराशेजारी बोलत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने चोरुन (Robbery Case) नेणार्या चोरट्याला महिलेने प्रतिकार करुन हात पकडला. तर त्याने महिलेचा ब्लाऊज ओढून तिचा विनयभंग (Molestation Case) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यासह १९ गुन्हे असलेल्या चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police) अटक केली आहे. (Arrest In Chain Snatching)
भारत बडगुजर (वय २८, रा. बिबवेवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. ही घटना बिबवेवाडीमध्ये मंगळवारी रात्री अकरा वाजता घडली होती. याबाबत एका ४१ वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बडगुजर याच्यावर तो अल्पवयीन असल्यापासून गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, मारामारी, दारु विक्री करणे अशा प्रकारचे १९ गुन्हे दाखल आहेत.
फिर्यादी या मुलीचे घराशेजारी फिर्यादी व त्यांचा भाऊसोबत बोलत होते. त्यावेळी भारत अचानक आला. त्याने फिर्यादीच्या भावास हाताने डोक्यात व कानाखाली मारली. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन तोडले. फिर्यादीने त्याला पकडले असता त्याने फिर्यादींना मारहाण केली. त्यांचे ब्लाऊज ओढून त्यांची बटने तोडली. त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पोलिसांनी भारत बडगुजर याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव तपास करीत आहेत.