Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे: भावी पत्नीशी फोनवर बोलतो ! रागातून वकिलाने तरुणाच्या डोळ्यात चटणी टाकून हेल्मेटने केली मारहाण

पुणे / पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | वकिलाचे लग्न ठरले आहे. त्याच्या भावी पत्नीशी फोनवर बोलतो, याचा राग मनात धरुन वकिलाने तरुणाच्या डोळ्यात चटणी टाकून डोक्यात हेल्मेट मारुन जखमी केले. (Bedum Marhan)

याबाबत सुदर्शन बाबुराव काळवे (वय ३३, रा. गीतसिद्धी अपार्टमेंट, मोतेरे हाऊस चौक, बोर्‍हाडे वस्ती, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल भिमराव पारवे (वय ३४, रा. दापोडी गावठाण) या वकिलावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोशीमधील बोर्‍हाडे वस्तीतील फिर्यादीच्या घराच्या पार्किंगमध्ये रविवारी रात्री अकरा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचा विवाह ठरला आहे. त्याच्या भावी पत्नीशी फिर्यादी सुदर्शन काळवे हा फोनवर बोलत असतो, याचा विशाल पारवे याला राग होता. विशाल पारवे हा रविवारी रात्री सुदर्शन काळवे याच्या घरी गेला. त्याला खाली पार्किंगमध्ये बोलावून जाब विचारला. तेव्हा त्यांच्यात वाद झाला. पारवे याने त्याला शिवीगाळ करुन “मी वकिल आहे. तुला कशात तरी अडकवतो,” अशी धमकी दिली. फिर्यादीच्या डोळ्यात चटणी टाकून हेल्मेटने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.