Pune Crime Branch News | पुणे: खंडणी विरोधी पथकाने दोघांकडून दोन पिस्टल केली हस्तगत; एकाच दिवशी दोन कारवाया

पुणे : Pune Crime Branch News | खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pune) एकाच दिवशी उत्तमनगर, शिवणे येथे कारवाई करुन दोघांकडून २ पिस्टल व २ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. राहुल कृष्णा गायकवाड (वय ३८,रा. इंद्रा वसाहत, एनडीए रोड, उत्तमनगर) आणि युवराज लेकराज वर्मा (वय २९, रा. गोसाळ चाळजवळ, उत्तमनगर) अशी दोघांची नावे आहेत. (Pistol Seized)
खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार उत्तमनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे व अमोल आवाड यांना बातमी मिळाली. त्याच्या आधारे पोलिसांनी राहुल कृष्णा गायकवाड याला पकडले. त्याच्या अंगझडतीत एक पिस्टल व एक जिवंत काडतुस असा ३५ हजार १०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील हे तपास करीत आहेत.
याच दरम्यान, पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे व पोलीस अंमलदार मयूर भोकरे यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे शिवणे येथे युवराज वर्मा याला पकडण्यात आले. त्याच्या अंगझडतीत एक पिस्टल व एक जिवंत राऊंड असा ३५ हजार १०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde) करत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक यशवंत ओंबासे, सहायक फौजदार प्रवीण ढमाळ, हवालदार सयाजी चव्हाण, रवींद्र फुलपगारे, अमोल आवाड, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, लहू सूर्यवंशी, प्रफुल्ल चव्हाण, राजेंद्र लांडगे, मयूर भोकरे, अमर पवार, गीतांजली जांभुळकर, अंकुश भिसे यांनी केली आहे.