Pune Crime Branch News | पुणे: तडीपार केले असतानाही शहर आलेला गुन्हेगार जेरबंद

tadipar

पुणे : Pune Crime Branch News | पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले असतानाही शहरात येऊन गुन्हे करण्याच्या तयारीत असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे. तन्मय अजित बेडगे (वय २१, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. (Tadipar Criminal Arrested)

तन्मय बेडगे याच्यावर हडपसर (Hadpasar) मधील सराफाला लुटण्यासाठी साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडण्यात आले होते. याशिवाय त्यावर जबरी चोरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस उपायुक्त यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक हडपसर परिसरात मंगळवारी सकाळी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना बातमी मिळाली की तडीपार गुंड तन्मय बेडगे हा क्वालिटी बेकरीजवळ थांबला आहे. या खात्रीशीर बातमीनुसार पोलीस पथक सकाळी साडेदहा वाजता तेथे गेले. त्यांनी तन्मय बेडगे याला ताब्यात घेतले. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईसाठी त्याला हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सचिन पवार, नितीन धाडगे, ऋषीकेश ताकवणे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.