Police Inspector Suspended In Pune | पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहायक उप निरीक्षक तडकाफडकी निलंबित, जणून घ्या प्रकरण

पुणे : Police Inspector Suspended In Pune | फसवणुकीच्या गुन्ह्यात (Cheating Fraud Case) अटक न करण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी केल्या प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr Pi Shrihari Bahirat) व सहायक फौजदार संतोष क्षीरसागर (Santosh Kshirsagar) यांना निलंबित केले आहे.
श्रीहरी बहिरट हे सध्या गुन्हे शाखेच्या दंगा काबु पथकामध्ये कार्यरत होते. श्रीहरी बहिरट हे गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस निरीक्षक असताना बहिरट यांच्या सांगण्यावरुन फसवणुकीच्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी सहायक फौजदार क्षीरसागर याने तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune ACB) याबाबत तक्रार मिळाल्यावर त्यांनी त्याची पडताळणी केली. त्यात क्षीरसागर याने तडजोडीअंती २ लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविली होती. यावेळी श्रीहरी बहिरट यांना तक्रारदार याचा संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडील व्हाईस रेकॉर्डर काढून घेतला होता. त्यानंतर सापळा कारवाई झाली नाही. परंतु, लाचेची मागणी झाली असल्याने क्षीरसागर याच्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या सहभागाविषयी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तपास करत आहे.
त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने बहिरट व क्षीरसागर यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले आहे.