Malshiras Assembly Constituency | ठरलं! पुन्हा राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर असा सामना रंगणार; मोहिते पाटील पार्सल बीडला पाठवणार? राजकीय वर्तुळात चर्चा

माळशिरस : Malshiras Assembly Constituency | मोहिते पाटील (Mohite Patil) यांच्या माळशिरस या राखीव विधानसभा मतदारसंघातून यंदा पुन्हा एकदा विद्यमान आमदार राम सातपुते (Ram Satpute) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्यात सामना रंगणार आहे. २०१९ ला आमदार राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांचा पराभव करीत माळशिरसचा गड मिळवला होता.
दरम्यान त्यावेळी मोहिते पाटील कुटुंब हे भाजपमध्ये होते आणि मोहिते पाटलांच्या मदतीने भाजपला माळशिरस विधानसभा जिंकता आली होती. आता यावेळी राजकीय समीकरणे बदलली आहेत. मोहिते पाटील यांनी लोकसभेला भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्याने आता उत्तम जानकर यांना मोहिते पाटील यांची मोठी ताकद मिळणार आहे.
महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) किंवा महायुतीचे (Mahayuti) अद्याप जागावाटप झाले नसले तरी माळशिरसची जागा शरद पवार गटाकडे असून येथील उमेदवारही उत्तम जानकर हेच असणार आहेत. तर महायुतीतील जागा वाटपात सध्या माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते असल्याने ही जागा भाजपला मिळणार असून भाजपने सध्याच्या सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणुकीत उतरवण्याची तयारी केल्याने माळशिरसची उमेदवारी राम सातपुते यांना नक्की झालेली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचार सभेत बोलताना धैर्यशील मोहिते पाटील (Dharyashil Mohite Patil) यांनी सातपुते यांच्यावर टीका करताना राम सातपुते नावाचे पार्सल पुन्हा बीडला पाठवणार असल्याचे म्हंटले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोहिते पाटील पार्सल बीडला पाठवणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.