Gang Rape In Bopdev Ghat Pune | पुणे: बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणात शोएब उर्फ अख्तार बाबू शेख (२७) याला अटक, 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्या प्रकरणात पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अटक केलेल्या शोएब उर्फ अख्तार बाबू शेखला न्यायालयाने २२ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Pune Police News)
शोएब उर्फ अख्तार बाबू शेख Shoaib Alias Akhtar Babu Shaikh (वय २७, रा. आदर्शनगर, मंतरवाडीजवळ, हडपसर) असे या दुसर्या आरोपीचे नाव आहे. बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा जणांनी सामुहिक अत्याचार केला होता. पुणे शहर पोलीस दलातील जवळपास ६० पोलीस पथके सर्वत्र शोध घेत होते. येवलेवाडी येथील एका दारुच्या दुकानाबाहेर हे तिघे जण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यांच्यापैकी चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया Chandrakumar Raviprasad Kanojia (वय २०, रा. डिंडोरी, मध्य प्रदेश) याला गेल्या शुक्रवारी पकडण्यात पोलिसांना यश आले होते. अन्य आरोपींबरोबर ओळख परेड व तपास करण्यासाठी कनोजिया याला सध्या न्यायालयीन कोठडी मंजुर करण्यात आली आहे. (Shivaji Nagar Pune Court)
शोएब उर्फ अख्तार बाबू शेख याला आज सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला प्रयागराज येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता अटक केली होती. पोलिसांनी आज न्यायालयात सांगितले की, अख्तर हा मुख्य सुत्रधार आरोपी आहे. त्याने व त्यांच्या साथीदारांनी केलेले कृत्य हे घृणास्पद व मानवी जिविताला काळीमा फासणारी आहे. घटनास्थळावरुन जाण्याकरीता वापरलेले वाहन जप्त करायचे आहे. आरोपींनी तरुणीचे हिसकावलेले सोन्याची चैन, अंगठी जप्त करायची आहे. फरार झालेल्या काळात तो कोठे होता, याचा तपास करायचा आहे. त्याचा रक्त, नखे, केस व थुंकीचा नमुना घ्यायचा आहे. डी एन ए करीता रक्त नमुना घ्यायचा आहे. त्याने इतर आरोपींच्या साथीने गुन्हा कसा केला याबाबत त्याच्याकडे तपास करायचा आहे. आणखी कोणी साथीदार आहे का याचा तपास करायचा आहे. (Pune Crime Branch)
त्यांचा आणखी एक साथीदार बाप्या ऊर्फ सोमनाथ यादव (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याचा शोध घ्यायचा आहे. यासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने २२ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.