Ganesh Satav News | पुणे महापालिकेच्या 34 गाव समिती सदस्य पदी शिवसेनेचे गणेश सातव यांची निवड

वाघोली : Ganesh Satav News | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) हद्दीत नव्याने सामाविष्ट ३४गावांच्या मुलभूत सोयी सुविधा सोडवण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या स्वीकृत सदस्य पदी १५आक्टोबर २०२४ रोजी युवासेना जिल्हाप्रमुख गणेश बाळासाहेब सातव (Ganesh Balasaheb Satav) यांनी निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य प्रतोद,व गटनेते भरतशेठ गोगावले, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे,युवासेना निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख तथा शासन नियुक्ती सदस्य (नगरसेवक) गणेश सातव यांनी सांगितले.