Ex MLA Son Suicide Case | शिंदे गटाचे नेते, माजी आमदाराच्या मुलाची आत्महत्या; बेरोजगारीला कंटाळून गळफास घेतल्याचा पोलिसांना संशय

मुंबई : Ex MLA Son Suicide Case | शिंदे गटाचे नेते, माजी आमदार राम पंडागळे (Ex MLA Ram Pandagale) यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जयेश पंडागळे (वय. ३९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमधील राहत्या घरी त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली.
मृताजवळ कोणतीही सुसाईड नोट (Suicide Noted) सापडली नसून बेरोजगारीला कंटाळून त्याने आपली जीवनयात्रा संपवली, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस (Samta Nagar Police) अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश रविवारी (दि.१३) दुपारी २:०० वाजताच्या सुमारास झोपायला जातोय, असे सांगत त्याच्या बेडरूममध्ये गेला. मात्र, तो बराच वेळ बाहेर न आल्याने त्याच्या आईने त्याला हाक मारली, पण त्याच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर जयेशच्या कुटुंबातील लोकांनी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्याच्या बेडरूमचा दरवाजा तोडला असता तो छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.