Teacher Protest – PMC News | पुणे महापालिकेवर शिक्षकांचे 15 ऑक्टोबरला ‘या’ मागणीसाठी न्याय आंदोलन

Teacher Protest

पुणे : Teacher Protest – PMC News | पुणे महानगरपालिका मधील मराठी माध्यमाचे शिक्षक कर्मचारी मंगळवार दि. 15 ऑक्टोबर रोजी अनुसूचित जाती व जमाती कृती समिती मार्फत न्याय आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे.

पुणे महानगरपालिकेतील शिक्षक कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने फेरफार करण्यात आला असून त्यामुळे शिक्षकांची सेवाज्येष्ठता डावलण्यात आली आहे. जोपर्यंत यादी दुरुस्त करण्यात येत नाही तोपर्यंत प्रमोशन अथवा समायोजन करण्यात येऊ नये अशी प्रमुख मागणी कृती समितीने केली आहे.

10 ऑक्टोबर रोजी शिक्षण विभागाने (प्राथमिक) मुख्याध्यापक पदोन्नती देण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकावर कृती समितीने आक्षेप घेतला असल्याची माहिती कृती समितीने दिली आहे.

यावेळी अर्चना भिसे, दीपक हिले, रोहिदास सुपे, शशिकांत धुमाळे, गंगाधर जावळे, प्रफुल्ल कांबळे, केशव वाघमारे, संदीप भवारी, संतोष धराडे, शशिकांत भिसे, शहाजी गोरवे इत्यादी उपस्थित होते. या न्याय आंदोलनास माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.