Pune Metro News | पुण्यातील दोन नव्या मेट्रो मार्गांना कॅबिनेट बैठकीत मंजुरी; शहरातील मेट्रोचे जाळे अधिक भक्कम होणार; जाणून घ्या दोन नवे मार्ग

Metro (1)

पुणे : Pune Metro News | शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न भीषण बनत चालला आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे. दरम्यान शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शहरामध्ये मेट्रो सुरू करण्यात आली आहे.

शहरातील सुरु असलेल्या मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता पुणे मेट्रो संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यात खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन नव्या मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत आज (दि.१४) मंजुरी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.

महायुती सरकारने (Mahayuti Govt) शहरातील वाहतूक सक्षमीकरणासाठी घेतलेल्या निर्णयामुळे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांचे आभार मानले आहेत.