Parvati Pune Crime News | पोलिसांना सांगितल्याच्या संशयावरुन सराईत गुंडाने तरुणाला केली लाकडी दांडक्याने मारहाण; वाघजाई माता मंदिराजवळील घटना

पुणे : Parvati Pune Crime News | पोलिसांना आपल्याबद्दल काहीतरी सांगितले, या संशयावरुन सराईत गुंडाने तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (Bedum Marhan) करुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत राहुल पोपट लंगर (वय ३३, रा. जनता वसाहत, पर्वत) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संकेत शिंदे (रा. जनता वसाहत) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जनता वसाहतीतील वाघजाई माता मंदिराच्या वरच्या टप्प्यावर शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत शिंदे हा सराईत गुंड असून त्यांच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, दत्तवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो खाली गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी हे देवीच्या दर्शनाकरीता गेले होते. त्यावेळी मंदिराच्या वरच्या टप्प्याजवळ आरोपी मित्रांसोबत बसला होता. फिर्यादीने त्याच्याबद्दल पोलिसांना काहीतरी सांगितले, या गैरसमजातून त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करुन तू परत आमच्या नादाला लागला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.