Mundhwa Pune Crime News | पुणे: संतापजनक ! मानलेला भावाकडून ४ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, मुंढव्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : Mundhwa Pune Crime News | ज्याला भाऊ मानले, त्यानेच ४ वर्षाच्या मुलीला घरातून उचलून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) एका ३५ वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घोरपडी (Ghorpadi Pune) येथील दुर्गा माता मंदिराशेजारी व ताराबाग सोसायटीजवळ,रेल्वे लाईनच्या बाजूला रविवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. पिडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आरोपी नराधमाला भाऊ मानत होती. त्यामुळे त्याचे घरात जाणे येणे होते. रविवारी सकाळी फिर्यादी व त्यांचे पती घरात नसल्याचा फायदा घेऊन तो घरी आला. फिर्यादी यांची ३ वर्षे १० महिन्याच्या मुलीला फुस लावून आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागला. तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीने त्याला विरोध केला. तरीही त्याने या मुलीला घेऊन जाऊन तिच्यावर लैगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले. तेथेच पिडित मुलीच्या आईची फिर्याद घेतली. हा नराधम पळून गेला आहे. मुंढवा पोलीस त्याचा शोध घेत आहे.