Mahavikas Aghadi On Mahayuti | ‘महाराष्ट्र हा मोदी- शहा गुलामांची वसाहत’, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘राज्यात सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत’

मुंबई : Mahavikas Aghadi On Mahayuti | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. विधानसभा जिंकण्यासाठी मविआने खास रणनीती आखली आहे. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. यावेळी महायुती सरकारवर (Mahayuti Govt) जोरदार प्रहार करण्यात आला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ” हे सरकार म्हणजे गद्दारीचा पंचनामा आहे. यामध्ये गद्दारी फक्त राष्ट्रवादी किंवा शिवसेना पक्षासोबत झालेली नाही तर ही गद्दारी महाराष्ट्रासोबत झाली आहे. जणू काही महाराष्ट्र हा मोदी- शहा गुलामांची वसाहत झाली आहे, अशा पद्धतीने हे सरकार चालवत आहेत. हे सरकार आता घालवलं पाहिजे. सर्व बाबतीत बोजबारा उडालेला आहे. दोन पोलीस कमिशनर असलेले मुंबई हे शहर आहे. पण कारभाराचे काय?

महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षातील नेते असुरक्षित आहेत तर सामान्य जनतेचे काय? जेवढी गद्दारांना, त्यांच्या समर्थकांना आणि कुटुंबाला सुरक्षा देण्यात आली आहे. ती काढून जनतेसाठी वापरा. मला वाटतं ह्यांच्या घरी धुणी भांडी करणाऱ्यांना पण सुरक्षा दिली असेल. ही पोलिसांची सुरक्षा जनतेच्या रक्षणासाठी आहे. हे सरकार आपल्या अंगाला काही लागू देत नाही. कारभाराची जबाबदारी घेत नाहीत”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले म्हणाले, ” महायुती सरकारच्या भष्ट्राचाराची अनेक उदाहरण देता येतील. काल या भागामध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. सत्ता पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत. आधी आम्ही विचारत करत होतो की राज्यात महिला अन् शाळेत जाणाऱ्या ५ वर्षांच्या मुली सुरक्षित नाही. तर या घटनेमुळे राज्यात सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत, हे समोर आले आहे. तर मग जनतेची काय स्थिती असेल.

यांचा आता राजीनामा नाही तर यांना जनताच सत्तेवरुन उतरवेल. फक्त स्वतः राजकारण करणं हाच राज्य सरकारचा मानस आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सुद्धा असंविधानिक पद्धतीने पदावर बसवले आहे. यामुळे पोलिसांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा मतभेद झाले आहेत. त्यांच्यामुळे राज्यातील सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत”, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.