Maharashtra Assembly Election 2024 | भाजपच्या निवडणूक समितीची महत्वाची बैठक; उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

BJP-Leaders-in-Maharashtra

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१३) भाजप निवडणूक समितीची महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar), पंकजा मुंडे (Pankaja Munde), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यासह समितीचे इतर नेते राहणार उपस्थित राहणार आहेत. (Mahayuti Seat Sharing Meeting)

भाजपची पहिली यादी येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने या बैठकीत नावावर अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी पुढील दोन दिवस भाजपच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. (Maharashtra BJP Meeting)

भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, कोकण विभागानंतर आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा निहाय बैठका तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बैठकही होणार असल्याचे बोलले जात आहे.