Lawrence Bishnoi Gang-Baba Siddique Death | लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; ‘जय श्री राम’ म्हणत सांगितलं कारण; म्हणाले, ” सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करणारा…”

मुंबई : Lawrence Bishnoi Gang-Baba Siddique Death | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर ही हत्या नेमकी का झाली याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.
आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. त्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती देण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या का करण्यात आली हे या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच या हत्येसाठी सलमान खान (Salman Khan) जबाबदार असल्याचेही म्हंटले आहे.
समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये लॉरेन्स बिष्णोई गॅंग ने म्हंटले आहे की, ” ओम, जय श्री राम, जय भारत, मला जीवनाचं सार समजतं आणि संपत्ती आणि शरीराला मी धूळ समजतो. मैत्रीच्या कर्तव्याचा सन्मान करत मी जे योग्य होतं तेच केले. सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं. पण तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला.
आज बाबा सिद्दीकी यांचा शालीनपणाचा सागर संपला आहे किंवा एकेकाळी त्याच्यावर दाऊद सोबत मकोका होता. त्याच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्याचे दाऊद आणि अनुज थापन यांच्यासोबत बॉलिवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहाराशी असलेले संबंध.
आमचं कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मात्र, सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करणारा जो कोणी असेल त्याने तयार राहावे. जर कोणी आमच्या भावांना मारले तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. आम्ही कधीच पहिला वार करत नाही. जय श्री राम, जय भारत, शहीदांना विनम्र अभिवादन.” असा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आला आहे.