Indapur Assembly Constituency | हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला काँग्रेस आमदाराचा विरोध; म्हणाले – ‘काँग्रेस भवन जोपर्यंत…’

इंदापूर : Indapur Assembly Constituency | भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला (BJP) रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला (Sharad Pawar NCP). त्यामुळे आता आगामी विधानसभेला (Maharashtra Assembly Election 2024) हर्षवर्धन पाटील तुतारी (Tutari) चिन्हावर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. इंदापूरमध्ये झालेल्या पक्ष प्रवेश मेळाव्यात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून तसे संकेत देण्यात आले होते. (Harshvardhan Patil News)
मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच विरोध होत असताना आता काँग्रेसच्या आमदाराने (Congress MLA) ही विरोध दर्शवला आहे. शरद पवार गटातील नाराज नेते आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा यांनी हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलेला आहे. तर आता आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रेस भवनावरून विरोध दर्शवला आहे.
काँग्रेस भवन जोपर्यंत पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी काँगेस पक्षाकडे केली आहे.
यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या उपस्थितीत काल (दि.१३) आमदार संजय जगताप यांची बैठक झाली. त्यानंतर इंदापुरातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाचा मुद्दा पुढे केला. त्यानंतर आमदार संजय जगताप यांनी यशोमती ठाकूर यांच्याकडे जोपर्यंत इंदापूर पक्ष कार्यालय पुन्हा एकदा काँग्रेसला मिळत नाही. तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी काँग्रेस पक्षाकडे केली आहे.