Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाट अत्याचारप्रकरणी नराधमास 3 दिवसांची पोलीस कोठडी

Bopdev-Ghat-Pune (1)

पुणे : Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक केली असून न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया Chandrakumar Raviprasad Kanojia (वय २०, रा. डिंडोरी, मध्य प्रदेश) असे या नराधमाचे नाव आहे. येवलेवाडी परिसरातून चंद्रकुमार कनोजिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने अन्य दोघा साथिदारांच्या बरोबर हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. कोंढवा पोलिसांनी त्याला शनिवारी दुपारी शिवाजीनगर न्यायालयात (Shivaji Nagar Pune Court) हजर केले. (Kondhwa Police Station)

सरकारी वकील विजयसिंह जाधव (Adv Vijaysinh Jadhav) यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीचे दोन साथीदार फरार आहेत. आरोपींच्या मदतीने त्यांचा शोध घ्यायचा आहे. ज्या हत्याराने पिडिताला धमकाविल. ते हत्यार जप्त करायचे आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असून त्याचा डीएनए अहवाल प्राप्त करायचा आहे. आरोपीने पीडिताकडे असलेली सोन्याची चैन चोरली आहे. ती जप्त करायची आहे, असे सांगत पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक युवराज हांडे (PI Yuvraj Hande) अधिक तपास करीत आहेत.