Dhanori Pune Crime News | पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून केला खून; धानोरीतील सोमवारी पहाटेची घटना

पुणे : Dhanori Pune Crime News | स्वत: काम धंदा न करता घरात बसलेल्या पतीने पत्नीच्या चारित्र्याचा संशय (Character Doubts On Wife) घेऊन तिच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून खून केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) पतीला ताब्यात घेतले आहे. (Murder In Dhanori Pune)
माधुरी मनोहर मोरे (वय ४७, रा. मुंजोबा वस्ती, धानोरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी सांगितले की, मोरे कुटुंबाला चार मुले असून दोन मुलींचे विवाह झाले आहेत. एक १४ वर्षाची व ११ वर्षाचा मुलगा आहे. मनोहर मोरे हे काही कामधंदा करत नसून त्यांना कर्करोग झाल्याचे सांगण्यात येते. माधुरी मोरे या स्वयंपाकाची कामे करत होत्या.
मोरे पतीपत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भांडणे होत होती. मनोहर हा पत्नी माधुरीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्यावरुन त्यांच्यात भांडणे होत होती. सोमवारी पहाटे त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा मनोहर याने रागाच्या भरात गॅस सिलेंडर पत्नीच्या डोक्यात घातला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या माधुरी हिचा मृत्यु झाला.
या घटनेची माहिती कोणीतरी ११२ नंबरवर दिली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav), वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव (Sr PI Kanchan Jadhav) व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली.