Chhagan Bhujbal On Baba Siddique Death | ‘गृहमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे’, बाबा सिद्दिकींच्या हत्येवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘गृहमंत्री नव्हे तर मुख्यमंत्र्यांची जबाबदारी’

मुंबई : Chhagan Bhujbal On Baba Siddique Death | माजी राज्यमंत्री बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री (दि.१२) नऊ वाजताच्या सुमारास भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे काय कारण असेल याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ” सिद्दिकी यांच्या हत्येमागे राजकारण आहे असं मला वाटत नाही. याच्यामध्ये काही व्यवहार किंवा खंडणी असा काहीतरी प्रकार मला दिसून येत आहे. पोलिसांना सर्व काही कळतंय पोलिसांनी त्याचा बीमोड केला पाहिजे.”
कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, ” कायदा व सुव्यवस्था राखणे फक्त गृहमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. यासाठी पोलीस खात्यात योग्य प्रकारचे अधिकारी नेमले गेले पाहिजेत. योग्य अधिकारी कोण आहेत ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहीत असतं.”
ते पुढे म्हणाले, ” मुंबई पोलिसांना माझी विनंती आहे की, आपलं नाव खराब होत आहे ते सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता कठोरपणे या सर्वांचा बंदोबस्त झाला पाहिजे. असे करताना गृहमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, मी तुमच्या पाठीमागे उभा आहे असं सांगितलं पाहिजे. जे कोणी गुंड आहेत त्यांची विल्हेवाट लावा “, असेही भुजबळ यांनी म्हंटले आहे.