Baner Hill Pune | बाणेर टेकडीवर पुन्हा लुटालुटीची घटना; महिलांना लुबाडले

पुणे : Baner Hill Pune | पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या नागालँडच्या विद्यार्थ्याला लुबाडण्याची घटना ताजी असतानाच बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या तीन महिलांना जखमी करुन लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे. (Robbery Case)
याप्रकरणी अबिनीयु चवांग (वय ३६, रा. औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेर टेकडीवर रविवारी दुपारी सव्वाचार वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मैत्रिण चिंगमलाई पामेई आणि अपार डलना (वय ३६) या वॉकिंगकरीता बाणेर टेकडीवर गेल्या होत्या. टेकडी उतरत असताना चौघा चोरट्यांनी त्यांना अडविले. फिर्यादी यांच्या मैत्रिणीच्या हातावर हत्याराने मारुन तिच्या करंगळी शेजारी बोटाला जखमी केले. शिवीगाळ करुन तिच्याजवळील ५१ हजार रुपयांचा मोबाईल, इअर बडूस व सॅक असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करीत आहेत.