Punit Balan Group (PBG) | काश्मीर खोऱ्यात विजया दशमी उत्सव उत्साहात साजरा ! श्रीनगरमधील पुनीत बालन ग्रुप व काश्मिरी पंडित संघर्ष समिती आयोजित रावण दहन कार्यक्रम ठरला आकर्षण (Video)

श्रीनगर/ पुणे : Punit Balan Group (PBG) | काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) विजयादशमी (दसरा) उत्सव मोठ्यात उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. श्रीनगर येथे पुनीत बालन ग्रुप व काश्मिरी पंडित संघर्ष समिती (Kashmiri Pandit Sangharsh Samiti) यांच्या वतीने दसरा मोहत्सव 2024 (Dasara Mahotsavam 2024) निमित्त सलग दुसऱ्या वर्षी आयोजित प्रतिकात्मक रावण दहन (Ravan Dahan Sohala) कार्यक्रम हा या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला. हजारो काश्मिरी नागरिकांनी रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर स्टेडियम येथे या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समृद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा काश्मिर खोऱ्याला लाभला आहे. त्याला चालना देण्यासाठी श्रीनगर येथे पुनीत बालन ग्रुप व काश्मिरी पंडित संघर्ष समिती यांच्या वतीने गत वर्षीपासून ‘दसरा मोहत्सव’ सुरू करण्यात आला आहे. वाईटावर चांगल्या प्रवृत्तीचा विजयाचे प्रतिक म्हणून यावर्षी या मोहत्सवात रावण, मेघनाथ आणि कुंभकरण यांच्या प्रतिकात्मक दहन करण्यात आले. काश्मीर खोऱ्यातील हा एकमेव विजय दशमी उत्सव असल्याने हा कार्यक्रम पाहण्यासाठी विविध शासकीय अधिकाऱ्यांबरोबर येथील समाजातील सर्व घटकांतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. रावण दहन कार्यक्रम आता काश्मिरी पंडित आणि मुस्लिम यांच्यातील सामायिक सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनले आहे, ज्यामुळे विविधतेतील एकतेच्या कल्पनेला बळकटी मिळाली आहे. या वर्षीच्या उत्सवाने सांप्रदायिक सलोख्याचा संदेश आणखी मजबूत केला. या उत्सवाचे प्रायोजक पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या पुनीत बालन ग्रुपने सलग दुसऱ्या वर्षी हा मोहत्सव यशस्वी होण्यासाठी मोठे सहकार्य केले. पुनीत बालन यांची जी सामाजिक बांधिलकीमुळेच या भव्य पुतळण्यांची उभारणी आणि सर्व कार्यक्रम शक्य होऊ शकला अशी भावना काश्मिरी पंडित संघर्ष समिती यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. त्याबद्दल त्यांनी पुनीत बालन यांचे आभारही व्यक्त केले.