Solid Waste Management PMC | शहरातील चार झोनमधील मोठ्या रस्त्यांच्या यांत्रिक सफाईसाठी 160 कोटींची फेरनिविदा; एस्टीमेट प्रति कि.मी. 316 रुपयांनी वाढले

Pune PMC News | Contractual security guard works in Mumbai, salary in Pune! Municipal Corporation recovers from cheating company; Municipal Corporation looted by contractor who got work through political favor

पुणे : Solid Waste Management PMC | महापालिकेच्या चार झोनमधील अठरा मीटर रुंदीवरील प्रमुख रस्त्यांची आणि पदपथांची यांत्रिक पद्धतीने नियमीत सात वर्षे स्वच्छता करण्यासाठी घनकचरा विभागाने १६० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. यामध्ये चारही झोनमधील सुमारे ४० कि.मी.चे रस्ते आणि पदपथ स्वच्छ केले जाणार आहेत. तीन महिन्यांपुर्वी या कामासाठी काढलेल्या निविदा ३५ टक्के अधिक दराने आल्याने त्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता घनकचरा विभागाने प्रचलित दराचा अभ्यास करून फेरनिविदा काढली असून या कामाचे एस्टीमेट प्रति किलोमीटरसाठी ३१३ रुपयांनी वाढविण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation-PMC)

मागील काही वर्षांपासून शहरातील रुंदीने मोठ्या असलेल्या रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यात येते. महापालिकेच्या पाचही झोनमधील रस्त्यांच्या सफाईच्या कामासाठी पुर्वी दोन निविदा काढल्या होत्या. त्यापैकी एका ठेकेदाराकडे एका झोनचे काम होते तर उर्वरीत चार झोनचे काम दुसर्‍या ठेकेदाराकडे होते. चार झोनचे काम असलेला ठेकेदार बँकरप्ट झाल्याने फेब्रुवारीपासून त्याचे काम बंद झाले आहे. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून चार झोनमधील रस्त्यांवर कचर्‍याचे साम्राज्य दिसून येते.

  घनकचरा विभागाने तीन महिन्यांपुर्वी प्रचलित दराने चार झोनसाठी निविदा प्रक्रिया राबविली.फक्त रस्ते सफाईच्या कामासोबतच जेटींग मशीनने डिव्हायडर आणि पदपथही स्वच्छ करण्याचा यामध्ये समावेश करत प्रति किलोमीटरसाठी १ हजार २३ रुपये खर्चाचे एस्टीमेट करून निविदा मागविल्या. या निविदा ३५ टक्के अधिक दराने आल्या.त्यामुळे प्रशासनाने निविदा रद्द करत फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुन्हा रिइस्टीमेट करण्यात आले. नव्या एस्टिमेटनुसार प्रति कि.मी.साठी १ हजार ३३९ रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. तसेच पुढील प्रत्येकवर्षी सहा टक्के दरवाढ केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सात वर्षांमध्ये हा खर्च साधारण २०० कोटी रुपयांपर्यंत होणार आहे.
   यासंदर्भात घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली, की आताच्या निविदेत पदपथांचा समावेश करण्यात आला आहे. चारही झोनमधील साधारण १० कि.मी.च्या रस्त्यांची नियमीत स्वच्छता होणार आहे. प्रशासनाने पहिल्या निविदेत महापालिकेने दिलेला पुर्वीचाच दर दिला होता. परंतू नवीन निविदेत पिंपरी चिंचवड, नवी मुंबई आणि बृहनमुंबईमध्ये सुरू असलेल्या मॅकॅनिकल स्विपिंगच्या कामाशी तौलानिक अभ्यास तसेच रोजंदारीच्या दरातील वाढ गृहीत धरून एस्टीमेट केल्याने दर ३१६ रुपयांनी वाढला आहे.
   या कामाअंतर्गत सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगररस्ता, विमानतळ रस्ता, मगरपट्टा येथील रस्त्यांसारख्या मोठ्या रस्त्यांची व पदपथांची नियमीत सफाई केली जाणार असल्याचेही या अधिकार्‍यांनी नमूद केले.