Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार

पुणे : Pune Police Tadipari Action | हॉटेल व्यावसायिक व स्थानिक नागरिकांमध्ये दहशत माजवून जबरी चोरी (Robbery Case) करणार्या सराईत गुंडाला २ वर्षासाठी पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सौरभ विलास शिंदे (वय २६, रा. फुलगाव, ता. हवेली) असे या गुंडाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav) यांनी तडीपारीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
सौरभ शिंदे हा फुलगाव, तुळापूर, पेरणे फाटा, लोणीकंद परिसरात जबरी चोरी करुन लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता. तसेच हॉटेल व्यावसायिक स्थानिक नागरीकांना वारंवार त्रास देत होता. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करायला पुढे येत नव्हते. गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा, या उ्ददेशाने सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू, शुभम सातव यांनी शिंदे याच्यावर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांना पाठविला. जाधव यांनी प्रस्तावाची छाननी करुन सौरभ शिंदे याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार केले आहे. (Lonikand Police Station)
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सावत यांनी ही कारवाई केली आहे.