Shivsena Shinde Group Leader | ‘एकाच घरामध्ये सर्व पदे, इतर कार्यकर्ते मेले आहेत का?’, शिंदे गटाच्या नेत्याचा अजित पवारांच्या आमदाराला सवाल

सातारा : Shivsena Shinde Group Leader | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीत वाई मतदारसंघावरून (Wai Assembly Constituency) शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत, शिवसेनेत दोन गट पडलेत त्याचा परिणाम साताऱ्यातील समीकरणांवरदेखील झाला आहे.

सातारा जिल्ह्यात बदलेल्या समीकरणाप्रमाणं महायुतीचे सहा आमदार आहेत. तर, महाविकास आघाडीकडे दोन आमदार आहेत. सातारा जिल्ह्यात सातारा, माण, फलटण, वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण हे विधानसभा मतदारसंघ आहेत. शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र महाबळेश्वर येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे.

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेत नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. “एकाच घरामध्ये सर्व पदे मग वाई मधील इतर कार्यकर्ते मेले आहेत का? शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांची आमदार मकरंद पाटील यांच्यावर जाहीर सभेतून टीका केली.

या जनसंवाद यात्रेमुळे वाई विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये जोरदार वाद होण्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात पुरुषोत्तम जाधव यांनी शड्डू ठोकले आहे. वाई विधानसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार यावरून महायुतीमध्ये कुस्ती रंगणार का हे काही दिवसात समजेल, पण तोपर्यंत महायूतील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळेल.