Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्तुल बाळगणार्या गुंडाला अटक !

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदेशीरपणे पिस्तुल घेऊन फिरणार्या गुंडाला सांगवी पोलिसांनी (Sangvi Police) पकडून त्यांच्याकडून गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त केले आहे. प्रेम ऊर्फ सनी अनिरुद्ध चोपडे (वय २५, रा. जाधव वस्ती, डी मार्टचे पाठीमागे, रावेत) असे या आरोपींचे नाव आहे. (Pistol Seized)
याबाबत पोलीस अंमलदार प्रवीण दौलत पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुनी सांगवीतील वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटावरील रोडवर गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवीतील गणपती विसर्जन घाटावरील रोडवर एक जण पिस्तुल घेऊन फिरत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन प्रेम चोपडे याला पकडले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व ५०० रुपयांचे जिवंत काडतुस मिळाले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक ताकभाते तपास करीत आहेत.