Pimpri Chinchwad Crime Branch | आर्मीच्या वर्कशॉपमधून चोरले विदेशी पिस्तुल आणि तब्बल 80 काडतुसे; विक्री करताना तरुणाला अटक

Pimpri Chinchwad Crime Branch (3)

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch | खडकी येथील आर्मी ५१२ बसे वर्कशॉपमधील वसाहतीमध्ये घरफोडी करुन विदेशी पिस्तुल आणि ८० काढतुसे अल्पवयीन मुलाने चोरली. ती त्याने मित्राला दिली. पिस्तुल आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता विरोधी पथकाने अटक केली. चेतन राजू वानखेडे (वय १९, रा. खडकी बाजार) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. (Pistols And 80 Cartridges Sized)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक दापोडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सुमित देवकर, गणेश सावंत आणि हर्षद कदम यांना बातमीदाराने माहिती दिली की, दापोडी येथील पवना नदीच्या काठावर एक जण शस्त्र विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चेतन वानखेडे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी पिस्तुल आणि तब्बल ८० जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी शस्त्रसाठ्याविषयी चोकशी केल्यावर त्याने सांगितले की, माझ्या अल्पवयीन मित्राने खडकी येथील आर्मी ५१२ बेस वर्कशॉपमधील वसाहतीमध्ये घरफोडी करुन हे चोरले आहे. त्याने विक्रीसाठी आपल्याकडे दिल्याचे सांगितले.

सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे (ACP Dr Vishal Hire) यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ (Sr PI Vijay Dhamal), पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी (PSI Bharat Gosavi), पोलीस अंमलदार आशिष बनकर, गणेश सावंत, सुमित देवकर, हर्षद कदम, सोमनाथ मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.