Mundhwa Pune Crime News | दांडिया खेळण्याच्या वादात भांडणे सोडण्यास गेलेल्यावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : Mundhwa Pune Crime News | दांडिया खेळण्याच्या वादात भांडणे सोडविण्यास गेलेल्यावर टोळक्याने धारदार हत्याराने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) आठ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ईश्वर दांडेली (वय ४२, रा. तारादत्त कॉलनी, घोरपडी), मारुती गवंडी (वय ५८, रा. बी टी कवडे रोड, घोरपडी), ऋषिकेश दांडेली (वय २०, रा. तारादत्त कॉलनी, घोरपडी), निखिल गवंडी (वय ३२), संतोष दांडेली (वय ४०), जावेद शेख (वय २३), अनिकेत अनगल (वय २५, सर्व रा. बी़ टी़ कवडे रोड, घोरपडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना बी. टी. कवडे रोडवरील शिव मित्र मंडळात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
यामध्ये आनंद देवेंद्र मांगले (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी शितल आनंद मांगले (वय ४३, रा. पवार इंटरप्रायझेस, बी टी कवडे रोड, घोरपडी) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती दांडिया खेळण्यासाठी शिवमित्र मंडळ येथे गेले होते. यावेळी दांडिया खेळण्याच्या वादातून राजवर्धन नुगला यास मारुती गवंडी हा मारहाण करीत होता. ही भांडणे सोडविण्यासाठी आनंद मांगले गेले. तेव्हा आरोपींनी पूर्वीचा राग मनात धरुन फिर्यादीचे पती आनंद मांगले यांना मारहाण केली. ईश्वर दांडेली यांनी धारदार शस्त्राने आनंद यांच्या मानेच्या डाव्या बाजूला वार करुन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक टापरे तपास करीत आहेत.