Lashkar Pune Crime News | मुलाने अल्पवयीन मुलाबरोबर शाळेत केला अनैसर्गिक अत्याचार

पुणे : Lashkar Pune Crime News | कॅम्प परिसरातील (Camp Pune) एका शाळेमध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसर्या अल्पवयीन मुलाला स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Atrocities) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मे २०२४ पासून सप्टेंबर २०२४ दरम्यान वारंवार झाला आहे.
याप्रकरणी पिडित मुलाने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी दोघेही अल्पवयीन असून एकाच शाळेत शिकतात. मे महिन्यामध्ये शाळेत असताना आरोपी मुलाने फिर्यादीला डॉमेट्रीच्या शेवटच्या वॉशरुममध्ये नेले. तेथे जबरदस्तीने पँट काढायला लावली. त्यानंतर त्याला भिंतीकडे तोंड करुन उभे राहण्यास सांगितले. त्याने तसे करताच त्याच्यावर अत्याचार केला. तसा प्रकार बर्याच वेळा त्याने केला. हा प्रकार कोणास काही सांगू नको, असे धमकावले. या मुलाला त्रास होऊ लागल्याने त्याने ही बाब पालकांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक शिवनंदा जाधव (PSI Shivnanda Jadhav) तपास करीत आहेत.