Shivsena Shinde Group Leader | हरियाणा विधानसभेच्या निकालावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘ही महाविकास आघाडी आता टिकणार नाही’

मुंबई : Shivsena Shinde Group Leader | हरियाणा विधानसभा निवडणुकीमुळे महायुतीला (Mahayuti) एक प्रकारे बूस्टर डोस मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीत मोठी चिंता होती. मात्र हरियाणाच्या निकालाने महायुतीची ही चिंता दूर झाली आहे.
उलट काँग्रेसच्या अपयशाने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यावरूनच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “विधानसभेच्या निकालाने राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
हरियाणातच नव्हे तर महाराष्ट्रातही भाजपच्या नेत्यांमध्ये (BJP Leader) उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कालचा हरियाणाच्या निकाल आमच्यासाठी मोठा आशादायी आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीतही जनता आम्हाला पाठिंबा देईल “, असा विश्वास शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी वर्तवला आहे.
शिरसाट म्हणाले, “हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निवडणुकीत हरियाणा काँग्रेसच्या पारड्यात मते देईल, अशी स्वप्ने ते पाहात होते. पण निकाल लागल्यानंतर काँग्रेसने जल्लोष तर केलाच पण त्यानंतर मात्र त्यांची दाणादाण उडाली. काहीजण तर हरयाणा तो झाँकी है महाराष्ट्र अभी बाकी हैं, असे बोलू लागले होते. म्हणजेच आता काँग्रेसला ठाकरे गटाचं (Shivsena Thackeray Group) ऐकावं लागणार, आम्ही शुभेच्छा देतो. त्यांची भूमिका कायम राहावी, ही महाविकास आघाडी आता टिकणार नाही”, अशी खोचक टीकाही संजय शिरसाट यांनी केली आहे.