Sanaswadi Pune Accident News | युवा ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचा अपघाती मृत्यू ! सणसवाडी परिसरात हळहळ व्यक्त

चार महिन्यात अपघातात दोन ग्रामपंचायत सदस्यांचा मृत्यू
शिक्रापूर : Sanaswadi Pune Accident News | पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या सणसवाडी ता. शिरुर येथील युवा ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे (Nikita Hargude) यांचे अपघाती निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तर काही दिवसापूर्वीच सणसवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे यांचे देखील अपघाती निधन झाले होते ही घटना ताजी असताना युवा सदस्या निकिता हरगुडे यांच्या निधनाने सणसवाडी करांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
https://www.instagram.com/p/DA480yAppjM/
सणसवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे हे जून २०२४ मध्ये पायी रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या वाहनाची धडक बसून झालेल्या अपघात उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडले होते ,तर ६ ऑक्टोबर रोजी युवा ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे ह्या पुणे नगर महामार्गावरील कल्याणी फाटा येथे कंपनीमध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना नगर बाजुने पुणेच्या दिशेने चाललेल्या दुचाकीची निकिता यांना धडक बसून निकिता रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज ग्रामपंचायत सदस्या कु. निकिता रामदास हरगुडे वय २६ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला,
चार महिन्यात दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपघात आपले प्राण गमवावे लागल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.