Maharashtra Congress | काँग्रेसमध्ये गुप्त बैठका; हरियाणाच्या निकालाने गणितं बदलली; राजकीय वर्तुळात हालचाली

मुंबई : Maharashtra Congress | महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) आल्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आतापासूनच प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आपल्यामागे हमखास निवडून येण्याची खात्री असलेल्या संभाव्य उमेदवारांना ‘माझ्या पाठीशी उभे राहा’ असा संदेश देण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Assembly Election)

अद्याप विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच काँग्रेसमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळतेय. मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असे काही नेत्यांना मनोमन वाटू लागल्याने त्यांनी या गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.

हरियाणा निवडणुकीपूर्वी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार (Sharad Pawar NCP) गट या दोन्ही मित्र पक्षांवर जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पडाव्यात यासाठी दबाव टाकत होती. मात्र हरियाणा निवडणुकीच्या निकालानंतर चित्र पालटले असून आता काँग्रेसचे मित्र पक्षच त्यांच्यावर दबाव टाकू लागले आहेत. एकीकडे ही ओढाताण होत असताना काँग्रेसचे काही नेते आपली लॉबी बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत.