Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Prakash Ambedkar

हडपसर मधून मोहम्मद अफरोज मुल्ला यांना उमेदवारी जाहीर

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi-VBA) उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी वंचितने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून आज दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. (Prakash Ambedkar)

वंचितने १० उमेदवारांची दुसरी यादी आज (दि.९) जाहीर केली आहे. मलकापूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर (Hadapsar Assembly), माण, शिरोळ आणि सांगली या विधानसभा मतदारसंघासाठी वंचितने उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. सर्व उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत.

काँग्रेसचे माजी विधानपरिषद आमदार खातिव सैय्यद नातिकुद्दिन यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. बाळापूर (जिल्हा,अकोला) विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वंचितने जाहीर केलेले उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ खालीलप्रमाणे,

मलकापूर – शहजाद खान सलीम खान

बाळापूर – खातिब सय्यद नतीकउद्दीन

परभणी – सय्यद सलीम सय्यद साहेबजान

संभाजीनगर मध्य – मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक

गंगापूर – सय्यद गुलाम नबी सय्यद

कल्याण पश्चिम – अयाझ गुलजार मोहवी

हडपसर – मोहम्मद अफरोज मुल्ला

माण – इम्तियाज जफर नदाफ

शिरोळ – अरिफ मोहम्मअली पटेल

सांगली – अल्लाउद्दीन ह्यातचंद काझी