Khadki Pune Crime News | महिला शिक्षकाच्या घरात शिरुन सामानाचे केली नासधुस ! भाई म्हणविणार्या पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Khadki Pune Crime News | स्वत:ला भाई म्हणविणार्या टोळक्याने एका महिला शिक्षकीच्या घरात शिरुन सर्व सामानाची नासधुस करुन नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी खडकीतील गोपी चाळ येथे राहणार्या एका ४२ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आशिष कांगणे (वय १८, रा. खडकी), गौरव कांगणे (वय १९), छोटा लोहार (वय २०), अलोक रोकडे ऊर्फ सोनु (वय १९), मॅड्या ऊर्फ यश साळवे (वय २०, रा. खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी सोमवारी दुपारी चार वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात काही वाद झाले होते. फिर्यादी या घरात ट्युशन घेत होत्या. त्यावेळी आरोपी घरात शिरले. त्यांनी घरात येऊन मुलगा कोठे आहे, असा जाब विचारला. आशीष कांगणे याने हातातील रॉडने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करुन त्याची तोडफोड करुन नुकसान केले. अश्लिल शिवीगाळ करुन दमदाटी केली. आम्ही इथले भाई आहे, असे म्हणत दहशत निर्माण केली आहे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करीत आहेत.