NDA Uttam Nagar Accident News | टेम्पोच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यु; एनडीए उत्तमनगर रोडवरील घटना

पुणे : NDA Uttam Nagar Accident News | महाविद्यालयात दुचाकीवर जात असलेल्या महाविद्यालयीन तरुणाला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यु झाला. यश सुरेश तनपुरे (वय २१, रा. उत्तमनगर) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime News)
याबाबम निखील वानखेडे (वय २०, रा. उत्तमनगर) यांनी उत्तमनगरपोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एनडीए उत्तमनगरकडे जाणार्या रोडवर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व यश येनपुरे दुचाकीवरुन महाविद्यालयात जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी निखील वानखेडे हे गंभीर जखमी झाले. तसेच यश तनपुरे हेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर टेम्पो चालक पळून गेला असून सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे (API Amruta Chavre) अधिक तपास करीत आहेत.