Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP | शरद पवारांच्या खेळीने अजित पवारांचे टेन्शन वाढलं; ‘राष्ट्रवादी’ला रोखण्यासाठी थोरल्या पवारांकडून जोरदार फिल्डिंग

पुणे : Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी दाेन ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी शरद पवार गटाला ८ पैकी ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण असणार? याबाबत तर्क लावले जात आहेत.
हडपसरमधून (Hadapsar Assembly Constituency) प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांचे तर वडगाव शेरीमधून (Vadgaon Sheri Assembly Constituency) माजी आमदार बापू पठारे (Bapu Pathare) किंवा त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे (Surendra Pathare) यांची नावे आघाडीवर आहेत. तर पर्वतीमधून (Parvati Assembly Constituency) अश्विनी कदम (Ashwini Kadam), सचिन तावरे (Sachin Taware) खडकवासल्यातून (Khadakwasla Assembly Constituency) सचिन दाेडके (Sachin Dodke) हे जाेरदार प्रयत्न करीत आहेत.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने दाेन जागा जिंकल्या हाेत्या. तर खडकवासला आणि पर्वती या दाेन विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला हाेता. खडकवासला मतदारसंघात केवळ अडीच हजार मतांच्या फरकाने सचिन दाेडके यांना पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते.
तर पर्वतीमध्ये अश्विनी कदम यांनी आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना कडवी झुंज दिली हाेती. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. हडपसर,वडगाव शेरी या दाेन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहण्यास मिळू शकते. हे दाेन मतदारसंघ काेण राखणार याबाबत राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चा सुरु झाल्या आहेत.