Pune Police News | पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसविणार सर्च लाईट ! सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली माहिती

पुणे : Pune Police News | बोपदेव घाटात तरुणीवर तिघांनी केलेल्या सामुहिक अत्याचारानंतर (Gang Rape In Bopdev Ghat Pune) आता शहरातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व टेकड्यांवर सायरन बसवले जाणार आहे.
बोपदेव घाटात रात्री फिरायला आलेल्या जोडप्याला मारहाण करुन शस्त्राचा धाक दाखवून तिघा नराधमांनी तरुणीवर सामुहिक अत्याचार केला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. दोन दिवस अगोदर अशाच प्रकारे तरुणीचे अपहरण करुन तिचा विनयभंग (Molestation Case) करणार्या प्रकार घडला होता. बाणेर येथील टेकडीवर (Baner Hills) फिरायला आलेल्यांना लुबाडण्यात आले होते (Robbery Case). या सर्व घटना लक्षात घेऊन सर्व टेकड्यांवर सर्च लाईट बसविण्यात येणार आहे.
याबाबत सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांनी सांगितले की, टेकड्यांवर होणार्या चोर्या, लुट थांबविण्यासाठी पुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेथे वीजपुरवठा नाही, अशा टेकडीवर पोलीस मदत केंद्र उभारले जाईल. तेथे पोलीस वाहनांना सर्च लाईट देण्यात येईल. ती वाहने अशा टेकडीवर असतील. महापालिकेला सांगून या टेकडीवर वीज पुरवठा करण्यात सांगण्यात येणार आहे. जेथे जेथे अशा घटना झाल्या, त्या टेकडीवर सर्च लाईट उभारले जातील.