Pune Pimpri Chinchwad Crime News | लैंगिक छळ केल्याने १२ वर्षाच्या मुलीने केली गळफास घेऊन आत्महत्या; मोबाईलमधील माहितीवरुन छळाचा प्रकार आला समोर

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | वारंवार पाठलाग करुन लैगिक छळ (Sexual Harassment) केल्याने एका १२ वर्षाच्या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याचे निष्पन्न झाले. या मुलीच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या माहितीतून हा सर्व प्रकार समोर आला असून भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) दोघा मुलांना अटक केली आहे.
क्षितीज लक्ष्मण पराड (वय २०, रा. भोसरी), तेजस पांडुरंग पठारे (वय १९, रा. चर्होली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार भोसरीमधील महादेव कॉलनीत ६ जून रोजी सकाळी साडेसात वाजता घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चहाची टपरी आहे. त्यांच्या मुलीने ६ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी पाहिलेले सी सी टीव्ही फुटेज तसेच तिच्या खिशामध्ये मोबाईल मिळाला. या मोबाईल नंबरवरुन क्षितीज पराड व तेजस पठारे यांनी फिर्यादीच्या मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिचा लैंगिक छळ केला, हे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या मुलीने दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करीत आहेत.