Mahayuti News | महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजपात वादंग; ‘भाजपचा झेंडा हाती घेण्यासाठी राष्ट्रवादीत काम करीत आहोत का?’, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सवाल

Ajit-Pawar-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-3

नागपूर : Mahayuti News | विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर असताना महायुतीत अजूनही सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीला महायुतीत सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने अनेक नेते नाराज आहेत. दुसरीकडे भाजप (BJP) आणि शिंदे शिवसेनेच्या नेत्यांकडून (Shivsena Shinde Group) अजित पवारांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. (Ajit Pawar NCP)

https://www.instagram.com/p/DAuvN86pSkF

दरम्यान ही परिस्थिती असताना अजित पवारांनी आगामी निवडणूक महायुती म्हणूनच लढायची असल्याचे ठरवलं आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अद्याप जाहीर व्हायचा आहे. असे असताना नागपूर शहरातील सर्व ६ विधानसभा मतदारसंघात भाजपचेच उमेदवार लढणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर आमच्या मित्रपक्षांनी कमळाचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले आहेत. आम्ही भाजपचा झेंडा हाती घेण्यासाठी राष्ट्रवादीत काम करीत आहोत का? असा खडा सवाल शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत खडागंजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार पश्चिम नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी बॅनर, पोस्टर लावणे सुरू केले आहे. बंटी कुकडे शहर अध्यक्ष आहेत. जागा वाटपाचा तसेच उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार त्यांना नाही.

आमचे वरिष्ठ नेते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जागा वाटपाची चर्चा करीत आहेत. कोणाला कुठल्या जागा द्यायच्या हा त्यांचा अधिकार आहे. बंटी कुकडे यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे महायुतीत नाराजी निर्माण होऊ शकते. दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्या नाहीत तर पुढे काय करायचे याचा आम्ही नक्कीच विचार करू. दोन वर्षांपासून आम्ही अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत काम करीत आहोत. ते कमळाचा प्रचार करण्यासाठी नाही, असेही प्रशांत पवार यांनी सुनावले आहे.