Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलीस तपासाला वेग; दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी; 70 ते 80 किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहाणी तर 3 हजार मोबाईल क्रमांकाची तपासणी

Gang Rape In Bopdev Ghat Pune

पुणे : Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींच्या वर्णनावरून त्यांचे रेखाचित्र तयार केले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्यानेही पोलीस तपास करीत आहेत. (Pune Police)

https://www.instagram.com/p/DAuvN86pSkF

तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी ३ हजार मोबाईल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे.
https://www.instagram.com/p/DAswsxvJcNa/

बोपदेव घाट हा परिसर निर्जन आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच तांत्रिक अडचणींमुळे मोबाइल विश्लेषण करण्यात येत अडथळे आले आहेत. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरापर्यंत शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे.

गेल्या १५ दिवसात बोपदेव घाट मार्गे गेलेल्या ३ हजार मोबाईल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त आर. राजा (DCP R Raja) यांनी दिली आहे.