Baner Pune Crime News | बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; सुपरवायझरला अटक, तक्रारीची सुरक्षा व्यवस्थापकाने घेतली नाही दखल

Pune Crime News | A young man raped a mentally retarded minor girl; The nature of the rape was revealed in counseling, he had been abusing her for three years

पुणे : Baner Pune Crime News | शहरात महिलांवरील बलात्कार (Rape Case) आणि लैंगिक अत्याचारांच्या (Sexual Assault) घटना दररोज समोर येऊ लागल्या आहेत. बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधील (Jupiter Hospital Pune) स्वच्छतेचे काम करणार्‍या एका महिलेवर सुपरवायझरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे़ चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police) या सुपरवायझरला अटक केली आहे. (Arrest In Rape Case)

सोमनाथ लक्ष्मण बेनगुडे Somnath Laxman Bengude (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे) असे या नराधमाचे नाव आहे. या प्रकरणी २९ वर्षीच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार हॉस्पिटलमधील रेडिएशन विभागात २९ जून रोजी दुपारी घडला होता. या महिलेने सुरक्षा व्यवस्थापकाकडे तक्रार केली होती. परंतु, कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने त्यानंतर या महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या नेहमीप्रमाणे २९ जून रोजी कामावर आल्या होत्या. त्यांचे काम संपल्यानंतर त्या रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन खाली येत होत्या. त्यावेळी सुपरवायझर सोमनाथ बेनगुडे याने त्यांना सांगितले की, रेडिएशन विभागात धुळ असून तिथे स्वच्छता करण्याची सूचना केली. फिर्यादी या रेडिएशन विभागात स्वच्छता करण्यासाठी गेल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास बेनगुडे हा रेडिएशन विभागात पोहचला. त्याने दरवाजा बंद करुन फिर्यादीला चेंजिंग रुममध्ये ढकलत नेले. तेथे त्याने फिर्यादीवर बलात्कार केला. महिला घाबरुन रडू लागली. तेव्हा बेनगुडे याने हा प्रकार कोणाला काही सांगितलेस तर तुला कामावरुन काढून टाकेल, अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी या घाबरुन गेल्या. त्यानंतर त्यांनी या प्रकाराची सुरक्षा व्यवस्थापकाकडे तक्रार केली. परंतु, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आता महिन्याभराने महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हा सुपरवायझर सोमनाथ बेनगुडे याला अटक केली.